उस्मानाबाद : ब्रिटीश कौन्सिल संलग्नीत सायन्स ऑलमपियाड परीक्षेत उस्मानाबादच्या फ्लाइंग इंग्लिश स्कूलला विभाग स्तरावरील नऊ गोल्ड आणि एक सिल्वर पदक मिळाले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात पालक शिक्षक आणि शाळा संस्था यांनी समन्वयाने ऑनलाईन शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा विकास शक्य आहे, असे मत डॉ. मंजुळा पाटील यांनी व्यक्त केले.
सध्याच्या कोरोनाच्या काळात पालक शिक्षक आणि शाळा संस्था यांनी समन्वयाने ऑन लाईन शिक्षण दिल्यास विद्याथ्र्याचा विकास शक्य तसेच संस्थेचे आणि शाळेच्या विद्याथ्र्याच्या बौद्धिक विकास तसेच ऑन लाईन शिक्षणास प्रतिसाद दिल्यास विद्याथ्र्यांचा बौद्धिक विकास शक्य असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रतिनिधी डॉक्टर मंजुळा आदित्य पाटील यांनी फ्लाइंग च्या ब्रिटीश कौन्सिल संलग्नीत सायन्स ऑलमपियाड परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्याथ्र्यांना पारितोषिके नऊ सुवर्ण एक कांस्य ब्रोझ पदके आणि एक हजार रुपयाची एकोणीस भेट प्रमाणपत्र वितरीत करताना त्या बोलत होत्या.
ब्रिटीश कौन्सिल संलग्नीत सायन्स ऑलमपियाड परीक्षेत उस्मानाबादच्या फ्लाइंगला विभाग स्तरावर गणित विषयात गोल्ड पदक प्राप्त विद्यार्थी पडवळ अधिराज, क्षीरसागर श्रेया, राजेqनबाळकर अन्वी, भुसे नक्षत्रा, सामान्य ज्ञान विषयात गोल्ड पदक पडवळ अधिराज, घोळवे संदेश, वाकुरे प्रवीण, पवार संदेश आणि सिल्व्हर भुसे नक्षत्रा इत्यादी विद्याथ्र्यांना डॉ. मंजुळा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.सदर सायन्स ऑलमपियाड परीक्षेसाठी गणित-डांगे मनीषा, इंग्रजी-घोरपडे एम के, विज्ञान- घोलप एम एल इत्यादींनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ घोरपडे यांनी केले तर आभार सौ महाजन यांनी मानले. याप्रसंगी फ्लाइंगचे शिक्षक आवारे वासुदेव आणि प्राचार्य आनंद लोखंडे, पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुभाष भोसले यांनी प्रयत्न केले. फ्लाइंगच्या यशाबाबत आदर्शचे सुधीर पाटील, प्रेमाताई पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी कौतुक केले.
शहर-जिल्ह्यात कोरोनाने १० जणांचा मृत्यू