24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउस्मानाबादनफ्याचे पैसे वाटपातून यसवंडीत ढाबा चालकाचा खून

नफ्याचे पैसे वाटपातून यसवंडीत ढाबा चालकाचा खून

एकमत ऑनलाईन

वाशी : वाशी तालुक्यातील यसवंडी शिवारात ढाब्याच्या नफ्याचे पैसे वाटपावरून राजस्थानी ढाबा मालकाचा खून झाल्याची घटना ३१ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, वाशी तालुक्यातील यसवंडी शिवारात श्याम शेखावाटी राजस्थान ढाबा आहे. हा ढाबा अनुपसिंह सुशील शर्मा (३५) व अवनीश जागेराम मान यांच्या दोघात भागीदारीत आहे. ढाब्याच्या नफ्याचे पैसे वाटपाच्या कारणावरुन ३१ मे रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास अनुपसिंह व अवनीश यांच्यात ढाब्यावर वाद झाला.

याच रागातून अवनीशने भागीदार अनुपसिंह शर्मा यांच्या डोक्यात हातोडीने मारहाण करुन व बतईने गळा चिरुन त्यांचा खून केला. ढाब्यावरील आचारी मन्ना जगदीश डे याने १ जून दिलेल्या माहितीवरून वाशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३0२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या