24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादसंत जानकोजी भगत यांच्या वंशजाकडून ११ हजार लाडूंचे वाटप

संत जानकोजी भगत यांच्या वंशजाकडून ११ हजार लाडूंचे वाटप

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेचे अहमदनगर येथील भक्त संत जानकोजी देवकर (भगत) यांच्या वंशजाकडून शुक्रवार, दि. ३ जून रोजी सकाळी तुळजाभवानी मातेची यथोचित पूजाअर्चा करण्यात आली. यानंतर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते देवीभक्तांना ११ हजार बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.

पौरोहित्य देवीचे मुख्य भोपे पुजारी दिनेश कदम परमेश्वर यांनी केली. यानंतर मंदिरात व मंदिराबाहेर देवीभक्तांना लाडूचे वाटप कर्डिले, मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, देवीचे मुख्य महंत हमरोजीबुवा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, नागेश शितोळे, संकेत वाघे, भोपे पुजारी संजय सोंजी, अतुल मलबा, समाधान कदम, विकास मलबा, शशिकांत कदम, शिवाजी कदम, संकेत पाटील, पृथ्वी मलबा, अनुप कदम, संदीप मलबा, तसेच नगरचे पलंग पालखीचे मानकरी सागर भगत, बाळू भगत, शिवराम भगत, संदीप भगत, देविदास भगत, नीलेश भगत, मंगेश भगत,

वसंत भगत, सोमनाथ भगत, सुरेंद्र भगत, रवींद्र भगत, सुदाम भगत, गणेश भगत, संतोष भगत, दीपक भगत, निखिल भगत, ओम भगत, विशाल भगत, गोरव भगत, गजानन भगत, महेश भगत, बु-हाननगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, आगळगावचे सुरेश आगळे, सुरज आगळे, सरपंच उकिर्डे मॅडम, गोरमाळाचे सिद्धेश्वर शेंडे, अक्षय शिंदे, सुनील मेटे, सरपंच राजेंद्र पाटील,
निलकंठ उमरदंड, अजित मोरे, तुकाराम भुसारे, संतोष गिराम, महादेव मते, उपसरपंच उमेश खळदकर, सुरेश देशमुख, नानासाहेब बनसोडे यांच्यासह नगरचे भगत परिवारातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या