33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home उस्मानाबाद आत्महत्या नको; फक्त एक फोन करा

आत्महत्या नको; फक्त एक फोन करा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सध्याच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. तरीही ही वेळपण निघून जाईल, शेतक-यांनी अशा कठीण काळात आत्महत्येचा विचार करु नये.फक्त एक फोन करा आम्ही मदत करु अशी भावनिक हाक शिवार फाऊंडेशनच्यावतीने घालण्यात आली आहे.

अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे.

पण शेवटी आताच्या परिस्थितीत आलेली हतबलता, यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापांनो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, त्यातून नक्क मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका.

फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, देऊ. त्रस्त शेतक-यांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल, त्यासाठी फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

करूया जागर आत्मशक्तीचा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या