24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeउस्मानाबादकाळजी करू नका महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी

काळजी करू नका महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी

एकमत ऑनलाईन

लातूर : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरसह काही गावच्या शिवारात पिकांच्या नुसानीची व गावातील घरांची झालेल्या पडझडीची पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जाऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, काळजी करू नका महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी आहे, सर्वतोपरी मदत करेल अशा शब्दात त्यांना धीर दिला.

आज शनिवार दि. २ ऑक्टोबर २१ रोजी दुपारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील आठवडा बाजार परिसरातील अमोल कोळी व बालाजी सुरवसे यांच्या तेरणा नदीला पूर आल्यामुळे झालेल्या घराच्या नुकसानीची पाहणी केली. संबंधितांना नुकसान झालेल्या व्यक्तींना तातडीने जीवनावश्यक वस्तू तसेच तात्पुरती निवास व्यवस्था देण्यात यावी अशा सूचना केल्या. तसेच नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली.

यावेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, तहसीलदार गणेश माळी, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडे, उपसरपंच रवीराज चौगुले, तलाठी, ग्रामसेवक आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी,तेर ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या