प्रत्येकाला काहींना काही छंद असतो, पण तो जोपासला पाहिजे तरच त्याचे कौतुक होत असते, कळंब येथील पौर्णिमा नितीन मोहिते हिने मात्र चित्र कला, पेंटिंग या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोणतीही कलेत जीव ओतला की ती कला जिवंत होत असते.लॉकडाऊन च्या काळात, रिकामा भरपूर वेळ मिळाल्याने खूप काही शिकता आले व नवीन कला अवगत करता आल्या. त्यामुळे मला लॉकडाऊनचा फायदाच झाला. पूर्वी राज दरबारी, देवदेवतांच्या दरबारी ही कलेला विशेष महत्व होते व त्यांना प्रतिष्ठा ही होती. पुरातन मंदिरे पहिली तर वेवेगळ्या चित्रांनी त्या मंदिरांची सजावट केलेली दिसते.
पौर्णिमाला लहानपणापासूनच स्वामी समर्थ ची भक्ती करायला आवडते. बèयाच दिवसापासून स्वामी च्या केंद्रात काहीतरी करावे वाटत होते, पण यौग येत नव्हता. सध्या सर्व मंदिर बंद च आहेत, ही संधी साधून पौर्णिमा उस्मानाबाद येथील स्वामी समर्थ च्या मंदिरातील पेंqटग करून सुंदर अशी सजावट केली आहे. हे करताना तिला खूप समाधान झाले असून माझी ईच्छा पुर्ण झाल्याचे ती सांगते व आपली कला तीने स्वामी चरणी अर्पण केली आहे. यामुळे तीचे कौतुक होत आहे.
या काळात पौर्णिमा शेकडो वेगवेगळी चित्रे तयार केली आहेत. सध्या वेगवेगळ्या कलाकारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जे कलाकार फक्त आपल्या कलेवरच पोट भरू शकतात त्यांना शासनाने मदत करण्याची गरज आहे.नवरात्रीच्या काळात कलाकारांना कार्यक्रम भेटत होते, प्रत्येक गावातील मंदिरात सजावट, रंग रांगोटी, चित्रे काढली जायची पण यंदा मात्र सगळ बंद असल्याने, कलाकार जीवापाड जपलेली कला सोडून इतर व्यवसायाकडे वळला आहे. आई जगदंबा देवीने आम्हा कलाकारांना जगण्याचे व कला जोपासण्याचे बळ देवो, असे साकडे पौर्णिमा मोहिते हिने घातले आहे.
‘जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयेभक्त प्रारब्ध घडावी ही माय
लहानपणापासूनच मी श्री स्वामी समर्थ महाराजांची मी सेवा करत आलेले आहे, स्वामी नेच या महामारीला तोंड देण्याचे बळ दिल्याने, या काळात स्वामी च्या मंदिराची सजावट करण्याची संधी मला मिळाली. आई येदेश्वरी देवी ने आम्हाला जगण्याचे बळ द्यावे असे साकडे तिने घातले आहे, असे पौर्णिमा नितीन मोहिते ही ने दैनिक एकमत शी बोलताना सांगितले.