28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeउस्मानाबादखा. ओमराजेंना धक्का, पवनराजे मित्रमंडळ शिंदे गटात सामील होणार

खा. ओमराजेंना धक्का, पवनराजे मित्रमंडळ शिंदे गटात सामील होणार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सर्वसामान्य व तळागाळातील जनतेसाठी काम करणारे पवनराजे मित्र मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. पवनराजे मित्र मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सोडचिठ्ठी देऊन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये सामील होणार आहेत. तसेच मुख्यमंर्त्यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये ढोकी (ता. उस्मानाबाद) येथे भव्य मेळावा घेणार असल्याची माहिती मित्रमंडळाचे संस्थापक श्याम कुलकर्णी यांनी शुक्रवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कुलकर्णी बोलत होते. यावेळी पवन राजे मित्र मंडळाचे अध्यक्ष काकासाहेब खोत, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष सत्यनारायण लोमटे, तेरणा साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन रमाकांत टेकाळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, पवनराजे निंबाळकर मित्र मंडळाच्या माध्यमातून उस्मानाबाद व कळंब तालुक्यामध्ये १८८ शाखा रुजविण्याचे काम आपण केले. त्यामुळे २००४ मधील विधानसभा निवडणुकीत पवन राजेनिंबाळकर विजयाच्या टप्प्यात आले. या निवडणुकीत माजीमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात त्यांचा अवघ्या ४८४ मतांनी निसटता पराभव झाला. मात्र ते केवळ मित्र मंडळाच्या सहकार्यामुळे व संघटन कौशल्यामुळे, पवनराजे मित्र मंडळाच्या माध्यमातून ८ हजार पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते जोडले गेले. त्या माध्यमातून पवन राजेंिनबाळकर यांच्या राजकीय वाटचालीत साथ दिली. तसेच कै. पवन राजेनिंबाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर आजपर्यंत मित्र मंडळाच्या माध्यमातून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मदत केली. आमदार म्हणून त्यांनी ५ वर्ष काम केले. या काळात एकही रुपयाचा विकास निधी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला नाही. तर आता ते ३ वर्षापासून खासदार आहेत. या काळात देखील त्यांनी विकास कामासाठी एकही रुपयांचा निधी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. ही मोठी खंत असून त्यांच्यात झालेला बदल व अन्य परिस्थितीमुळे आगामी काळात १८८ शाखा व त्यांचे सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मित्र मंडळ बरखास्त करून बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये सहभागी होण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही गेली २५ वर्षाहून अधिक काळापासून कै. पवनराजे यांच्या विचारांशी बांधिलकी मानून सतत कार्यरत राहिलो आहोत. या काळात आम्ही आमचा वैयक्तिक फायदा न पाहता निरपेक्ष भावनेने सतत काम केले आहे. कै. पवनराजे यांच्या हत्तेनंतर तेरणा कारखाना खा. ओमराजेंच्या ताब्यात दिला. त्यांना आमदार करण्यात व आता खासदार करण्यात मित्रमंडळाचा मोठा वाटा आहे. खा. ओमराजे यांचे नेतृत्व व राजकीय कारकिर्द निरपेक्ष भावनेने कारकीर्द घडवली आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये खा. ओमराजे आमच्याकडे सद्भावनेने बघत नाहीत व आमची कोणतीही कामे त्यांच्याकडून व शिवसेनेकडून जाणिवपुर्वक होत नाहीत. त्यामुळे आम्ही पवनराजे मित्रमंडळ बरखास्त करून बाळासाहेबांची शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या