21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeउस्मानाबादभाविकांच्या मिनीबसला आयसरची धडक; ४ ठार, ३ गंभीर

भाविकांच्या मिनीबसला आयसरची धडक; ४ ठार, ३ गंभीर

एकमत ऑनलाईन

येरमाळा : टायर फुटल्याने रस्त्याच्याकडेला उभा केलेल्या मिनीबसला मालवाहतूक करणाèया आयसरने जोराची धडक दिली. या भिषण अपघातात तिरुपतीला निघालेल्या मालेगाव तालुक्यातील चौघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.२३) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळ घडली.

याबाबत माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील नितीन झालटे यांच्या मालकीची टेम्पो ट्रव्हल्स फोर्स कंपनीची मिनीबस क्र (एमएच ४१-­ए.यू.१५५४) या गाडीने तिरुपती बालाजी दर्शनासाठी मालेगाव तालुक्यातील शरद विठ्ठल देवरे (वय-४४) रा.वडगाव, विलास महादु बच्छाव (वय ४६) रा.सायने, जगदीश चंद्रकांत दरेकर (वय-४५) रा. दरेगाव, सतीश दादाजी सुर्यवंशी (वय-५०) रा.दरेगाव, संजय बाजीराव सावंत (वय-३८) रा. सायने, भरत ग्यानदेव पवार (वय ७४) रा. सायने, गोकुल हीरामन शेवाळे (वय ३८) रा.लोलवाडे, विनोद विठ्ठल सावंत (वय २८) सायने, ज्ञानेश्वर आनंता बच्छाव (वय ३८) रा.सायने, पोपट नानाजी शेवाळे (वय ३७) रा. सायने, अविनाश नागनाथ गोलाईत (वय ३२) रा. लोनवडे, ज्ञानेश्वर बाबुराव बच्छाव (वय ३८) रा. सायने, जयवंत सुनिव बच्छाव (वय ३४) रा. सायने, दादाजी पंढरीनाथ शिदे (वय ३५) रा .सायने, महेश बाळासाहेब जगताप (वय ३५) रा.भुतपाडा, किरण बाळु पवार (वय ३२) रा. मालेगाव हे जात होते.

रत्नापूर पाटीजवळील हॉटेल पांडुरंग समोर त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने गाडी रस्त्यांच्या बाजुला उभा करुन टायर बदली करत होते. यावेळी यावेळी अचानक औरंगाबादकडुन येरमाळ्याकडे येणारा भरघाव आयशर मालवाहतुक गाडी क्र.(एमएच २० ए.जी.१५१७) ने पाटीमागुन गाडीला जोराची धडक दिली. यात पुढे बसलेले शरद विठ्ठल देवरे, विलास महादु बच्छाव, जगदीश चंद्रकांत दरेकर, सतीश दादाजी सुर्यवंशी हे चारजण जागीच ठार झाले. तर बाजूचे संजय बाजीराव सावंत, भरत ग्यानदेव पवार, गोकुल हीरामन शेवाळे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहे.

सदरील घटनेची माहीती मिळताच येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश मुंढे, पोउनि ज्ञानेश्वर राडकर व पोलिस कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन जखमींना पुढील उपचारासाठी येरमाळा येथुन सोलापुरकडे दाखल केले.योगेश वाल्कीराव हांडे यांच्या फिर्यादीवरुन आयशर चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश मुंढे करीत आहेत.

ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हरडफ गावचा संपर्क तुटला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या