27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeउस्मानाबादबंद सुतगिरणीवरही चोरट्यांचा डल्ला, लाखोंचे साहित्य लंपास

बंद सुतगिरणीवरही चोरट्यांचा डल्ला, लाखोंचे साहित्य लंपास

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात एकमेव आणि तेही बंद अवस्थेत सुतगिरणी आहे. त्यातही सुतगिरणीमध्ये राहिलेल्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारुन लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना रविवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 9 विद्युत मोटारीसह सांजा येथील एकास ताब्यात घेतले आहे.

याबाबत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद-औसा रस्त्यालगतची सुत गिरणी बंद असल्याची संधी साधून गेल्या काही महिन्यांत गिरणीतील 20 शिवण यंत्रे, शिवण यंत्रांच्या 50 विद्युत मोटारी, 250 पंखे, एक रेफ्रीजरेटर, तीन तारांच्या विद्युत वायरचे 25 वेटोळे, एक बॉयलर विद्युत मोटार, एक बोअरवेल विद्युत मोटार असे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. या प्रकरणी गिरणी सुरक्षा व्यवस्थापक पांडुरंग मुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन रविवारी (दि.22) रात्री 1 वा. गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. मनोज निलंगेकर, पोना- हुसेन सय्यद, रवि आरसेवाड, साईनाथ आशमोड यांच्या पथकाने वेगाने चक्रे फिरवून सांजा येथील सुनिल राजेंद्र पवार यास या चोरीतील साहित्यापैकी शिवण यंत्रांच्या 9 विद्युत मोटारींसह ताब्यात घेतले असून उर्वरीत साहित्याविषयी व अन्य सहर्का­यांविषयी पोलीस तपास करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या