25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउस्मानाबादकवलदरा येथील उड्डाणपुलाखाली अनोळखी प्रेत आढळल्याने खळबळ

कवलदरा येथील उड्डाणपुलाखाली अनोळखी प्रेत आढळल्याने खळबळ

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कावलदरा या गावानजीक उड्डाण पुलाखाली ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी (दि.१३) एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे. त्यामुळे या व्यक्तीची आत्महत्या की खून असा पोलिसांकडून तर्क वितर्क लावण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. घटनास्थळी उस्मानाबाद आणि तुळजापूर पोलीस दाखल होवून पाहणी केली आहे.

गुढी पाढव्याच्या सनाच्या तोंडावर तुळजापूर शहरापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कावलदरा येथे उड्डाणपुलाच्या खाली अनोळखी प्रेत निदर्शनास आले. यावेळी माहिती कळताच दुपारी तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड व एलसीबीचे अधिकारी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कल्पना दिली. यावेळी तात्काळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे ए.पी. आय शिंदे, पोलिस राऊत, पोलिस घुगे, तुळजापूर पोलिस ठाण्याचे ए.पी.आय चव्हाण, रवि भागवत, रवि शिंदे घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली.

ओळखी प्रेत हे दोन दिवसापासून त्याच ठिकाणी पडले असावे. पुर्ण शरीर डिसपॉच झाले होते. डोक्यात आळ्या निदर्शनास येत होत्या आणी बॉडीची दुर्गंधी पसरली होती. मृत व्यक्तीच्या अंगावरील शर्ट काक्रंबा येथील टेलरने शिवलेला आहे असे पोलिस प्रशासनाकडून कळत आहे. तरी अद्याप मृत व्यक्तीचे ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीची ओळख पीएम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट कळेल. पुढील तपास पोलिस प्रशान करीत आहे. उशीरापर्यंत कारवाई चालु होती.

शर्टवरुन पोलिसांची तारांबळ; शर्ट निघाला कोरोनाबाधीत रुग्णाचा
येथील आढळलेल्या मृत व्यक्तीच्या शेजारी शर्ट आढळून आला. हा शर्ट काक्रंबा येथील टेलरने शिवलेला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी शर्टवरुन या प्रकरणाचा तपास सुरु केला. मात्र तपासात सदरील शर्ट हा कोरोनाबाधीत रुग्ण असल्यामुळे त्याने तो शर्ट फेकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून १५ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या