24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeउस्मानाबाददक्षिण जेवळीतील शेतकर्‍याला गांजा लागवड केल्याने अटक

दक्षिण जेवळीतील शेतकर्‍याला गांजा लागवड केल्याने अटक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : गांजाची लागवड केल्याप्रकरणी दक्षिण जेवळी येथील एका शेतकर्‍याला पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २९ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) गावातील शेतकरी शिवशंकर चंद्रकांत साखरे (वय २८) यांनी गट क्र. ३६७ मध्ये गांजा या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती.

यानंतर ही महिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उमरगा विभागाचे पोलिस उपअधीक्षक बरकते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि मनोज निलंगेकर, पोहेकॉ प्रकाश औताडे, अमोल निंबाळकर, धनंजय कवडे, पोना- काकडे यांच्यासह तहसील कार्यालय, लोहारा येथील नायब तहसीलदार महादेव जाधव व दोन पंच यांच्या उपस्थितीत दि. २९ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेतात पोलीस पथकाने छापा टाकला.

यावेळी शेतातील ऊस पिकात गांजाची १४ झाडे एका ओळीत लावलेली व त्यास पाने व बोंडे असलेली आढळली. ही गांजाची झाडे पथकाने मुळासकट उपटून जप्त केली असता त्यांचे वजन १८.२७ कि.ग्रॅ. इतके आढळले. याप्रकरणी शिवशंकर साखरे यांच्याविरुध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोहारा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ररवडे करत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या