30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादपंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांना पिककर्ज मिळेना

पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांना पिककर्ज मिळेना

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (सुभाष कदम): शहरातील पंजाब नॅशनल या राष्ट्रीयकृत बँकेने आठ गावातील शेतकऱ्यांना खरीपाच्या पिककर्जापासून जाणिवपुर्वक वंचित ठेवले आहे. या बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांचे अनेकांचे कर्ज माफ झालेले असून काही शेतकऱ्यांनी जवळचे पैसे भरून कर्जाची परतफेड केलेली आहे. तरीही बँकेकडून नवीन पिककर्ज देण्यास विविध कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकांना पिककर्ज वाटप करण्याची तंबी द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. कर्ज वाटप न झाल्यास आठ गावातील शेतकरी तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांना पिककर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट दिलेले आहे. त्यानुसार बँकनिहाय गावे दत्तक देण्यात आलेली आहेत. उस्मानाबाद शहरातील पंजाब नॅशनल बँकेला तालुक्यातील नांदुर्गा, मोहतरवाडी, पानवाडी, भंडारवाडी, उमरेगव्हाण, ककासपूर, गोगाव, भंडारी ही आठ गावे पिककर्ज वाटप करण्यासाठी दत्तक दिलेली आहेत.

२०१५ पासून पंजाब बँकेने या आठ गावातील बहुतांश शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप केले होते. अ़नेक शेतकèयांनी वेळेवर कर्जाचा भरणा करून परत पिककर्ज उचललेले आहे. अनेक शेतकऱ्यांना राज्य सरकारने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून कर्जमाफी दिलेली आहे. २०२०-२०२१ या वर्षासाठी पंजाब बँकेने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप केले नाही. कर्ज मागण्यासाठी या आठ गावातील हजारो शेतकरी बँकेत दररोज चकरा मारीत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत बँकेने एकाही शेतकऱ्यांला कर्ज वाटले नाही.

आता बँकेतील व्यवस्थापकासह सर्वच कर्मचाèयांच्या बदल्या झाल्या असून नव्याने मस्तुद नावाचे व्यवस्थापक बँकेत रुजू झाले आहेत. त्यांच्या जोडीला एक कॅशीयर आहेत. दैनंदिन कामे करण्यातच या दोघांचा वेळ जात असल्याने शेतकऱ्यांची पिककर्जाची प्रकरणे करण्यासाठी या दोघांना वेळ नाही. शेतकरी तर दररोजच कर्जाच्या मागणीसाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत.

या आठ गावातील शेकडो शेतकरी अद्यापही पिककर्जापासून वंचित आहेत. परंतू याकडे जिल्हा लिड बँकेचे व्यवस्थापक विजयकर यांना पहायला वेळ नाही. कर्ज मिळत नसल्याने शेतकरी वैतागले असून तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात शेतकरी दिसत आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी पंजाब बँकेच्या वरिष्ठांना बोलून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

खासदार, आमदारांनी लक्ष देण्याची मागणी
उस्मानाबाद तालुक्यातील नांदुर्गा, मोहतरवाडी, पानवाडी, भंडारवाडी, उमरेगव्हाण, ककासपूर, गोगाव, भंडारी ही आठ गावे पंजाब नॅशनल बँकेला दत्तक दिलेली असून २०२०-२०२१ या वर्षात या बँकेने अद्याप एकाही शेतकèयाला पिककर्जाचे वाटप केलेले नाही. काहीना काही बँकेच्या अडचणी सांगून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या बँकेत कर्मचारी नसल्याचे कारण सांगितले जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दखल घेऊन बँकेच्या वरिष्ठांना बोलून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

तुळजापूर येथे जनता कर्फुला प्रतिसाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या