24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeउस्मानाबादपावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांचा नभाकडे डोळा

पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांचा नभाकडे डोळा

एकमत ऑनलाईन

परंडा ( ) : तालुक्यात सर्वदूर रोहीणी नक्षत्रात पाऊस पडल्यामुळे शेतक-यांनी शेतातील पेरणीपुर्व कामे लगबगीने आटोपत कृषी सेवा केंद्रातुन पेरणीसाठी लागणारे बियाणे विकत घेऊन गोळा करून ठेवले. मात्र मृग नक्षत्राची सुरवात होऊन आठवडा लोटला तरी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी सध्या पेरणीसाठी पावसाची प्रतिक्षा करत नभाकडे डोळा लावुन बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मागील दीड वर्षापासुन कोरोना महामारीच्या अनेक झळा शेतकèयांना सोसण्याची पाळी आली यामुळे शेतक-याचे आर्थिक गणीत पुर्ण कोलमडले आहे मात्र पुढील उदरनिर्वाह भागविण्यासाठी बँकेचे कर्ज, वेळप्रसंगी सावकारी कर्ज यामधुन रकमेची जुळवाजुळव करत शेतीची नांगरणी, वाखारणी असे विविध कामे शेतकèयाने उरकली व सुरवातीलाच पेरणी केल्यानंतर पिक चांगले बहरून येते यासाठी महाग मोलाचे बीबीयाने विकत आणून गोळा करून ठेवले मात्र ऐन पेरणीच्या वेळी मृग नक्षत्राचा पाऊस गायब झाल्याने शेतकरी आभाळाकडे डोळा लावुन बसल्याचे चित्र दिसुन येत आहे.

कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन काळामध्ये शेतातील धान्याला कवडीमोल भावामध्ये विकुण उदरनिर्वाह भागविण्याची वेळ शेतक-यावर आली. या काळात शेतक-यांवर मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करण्याची पाळी येऊन आर्थिक गणिताचे पार कंबरडे मोडले. शासनाची काही मदत मिळेल या आशेवर बसलेल्या शेतक-याला कसलीही मदत मिळाली नाही यामुळे जगाचा पोशींदा असलेल्या शेतक-याने भविष्याचा विचार करून उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा कंबर कसलेली दिसत आहे मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा त्रास सहन करण्याची वेळ पुन्हा शेतक-यावर आल्याने शेतकरी हताष झालेला दिसुन येत आहे.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यावर अशी बिकट परिस्थिती उद्भवलेली असतानाही शासनाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने शेतक-यात नाराजी पसरल्याचे दिसुन येत आहे. कोरोनाकाळात केंद्र शासनाने शिधापत्रीका धारकांना स्वस्त धान्य दुकानातुन मिळणारा माल नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत वाटप करणार असल्याचे जाहीर केले आहे परंतु राज्य शासनाने फक्त जुन महिन्यातच मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील बरेच शिधापत्रीकाधारक शेतकरी मोफत धान्यापासुन वंचीत राहणार असल्याचे दिसुन येते.

सध्या शेतकरी पुढील दैनंदीन उदरनिर्वाहासाठी शेतातील पेरणीसाठी पुर्व तयारी करून बसलेला असुन आकाशात ढग दाटुन येतात मात्र पेरणीयोग्य पाऊस होत नसल्याने शेतकरी मृगाच्या पावसाची प्रतिक्षा करत व्याकुळ नजरेने नभाकडे डोळा लावुन बसला असल्याचे चित्र तालुक्यात दिसुन येत आहे.

मान्सुनपूर्व पावसाने रस्त्यांची दुरावस्था

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या