28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत गाडी पार्क करण्याच्या कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला

उस्मानाबादेत गाडी पार्क करण्याच्या कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाडी पार्क करण्याच्या कारणावरून दोघांवर 6 जणांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना १० नोव्हेंबर रोजी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी कलम ३०७ सह ऍट्रासिटी कायद्याअंतर्गत सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमनगर, उस्मानाबाद येथील राजाभाऊ आण्णाराव ओव्हळ व त्यांचा मुलगा सिध्दार्थ ओव्हळ हे दोघे दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथे गेले होते. यावेळी त्यांची गाडी पार्क करत असताना वडार गल्ली उस्मानाबाद येथील संदीप यल्लाप्पा बुट्टे, राहुल छोट्या मंजुळे, रोहीत हनुमंत जाधव यांच्यासह ५ ते ६ जणांनी गाडी पार्क करण्याच्या कारणावरुन ओव्हळ पिता-पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली. तसेच संदीप बुट्टे यांनी चाकुने व राहुल मंजुळे यांनी लोखंडी गजाने ठार मारण्याच्या उद्देशाने राजाभाऊ यांच्यासह त्यांचा मुलगा सिध्दार्थ यांना डोक्यात, हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीत राजाभाऊ ओव्हळ यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सुवर्ण साखळी खाली पडून गहाळ झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या