23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादमोटारसायकलच्या धडकेत वडील ठार, मुलगा जखमी

मोटारसायकलच्या धडकेत वडील ठार, मुलगा जखमी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : मोटारसायकलने दिलेल्या धडकेत वडील ठार तर मुलगा जखमी झाल्याची घटना कोकरवाडी ता. परंडा येथे घडली आहे. या प्रकरणी १५ ऑगस्ट रोजी आंबी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील कार्टी येथील सोनिया गावडे यांच्यासह त्यांचे पती आप्पा गावडे व मुलगा स्वराज गावडे असे तीघे कोकरवाडी येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. ४५ जे ७५७० वरून प्रवास करत होते. यावेळी लघुशंकेसाठी आप्पा गावडे यांनी मोटारसायकल रस्त्याकडेला उभी केली. त्यावेळी एका अज्ञात चालकाने बजाज मोटारसायकल निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवल्याने गावडे यांच्या मोटारसायकलला समोरुन धडकली.

या अपघातात आप्पा गावडे यांचा मृत्यू झाला तर मुलगा स्वराज गावडे हा जखमी झाला आहे. या अपघातानंतर धडक दिलेला अज्ञात मोटारसायकलचा चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. या प्रकरणी सोनिया गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या