25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउस्मानाबादतुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड

तुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तुळजापूर शहरात एकीकडे कोरोनाने कहर केलेला असताना रुग्णालयात व औषधी दुकानात रुग्णाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तुळजापूर शहरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड उडाल्याचे सोमवारी (दि.१२) पहावयास मिळाले.मद्य खरेदीसाठी नागरिकांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. दुकानासमोर गर्दी झाल्याने जमावबंदी आदेशासह कोरोना नियमांचे उल्लंघन होते आहे. अनेकजण गर्दीत कोरोनाची होण्याची शक्यता असतानाही रिस्क घेऊन दुकानासमोर गर्दी करीत आहेत.

एकीकडे रुग्णालयात जगण्याची धडपड करीत आहेत. त्यासाठी डॉक्टर, नातेवाईक जीवाचे रान करीत आहेत तर दुसरीकडे दारू दुकानात मद्यप्रेमींची दारूसाठी करण्यासाठी धावपळ होत आहे. असे चित्र कोरोना संकटात पाहायला मिळत आहे. दारू इतकी जीवनावश्यक बाब आहे का? हा प्रश्नही या संकटात समोर आला आहे.

शहरातील वाईन शॉपसमोर सकाळपासून मद्यप्रेमीची मोठी गर्दी होती. इथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणेने किंवा नेमून दिलेल्या पथकाने यावर कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. अनेकजण बॉक्सच्या बॉक्स खरेदी करून पिण्यासाठी व विक्रीसाठी साठा करीत होते. लॉकडाउन काळात हा मद्यसाठा नेहमीप्रमाणे चढ्या दराने विकला जाणार आहे.

मुरूम पालिकेवर टाळ मृदंगाच्या गजरात निषेध मोर्चा; दारु बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या