28.9 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू केली असून ज्या बांधकाम मजुरांची लूट झाली आहे, ते एकमत कार्यालयाकडे तक्रारी घेऊन येत आहेत. गुरुवारी (दि. २६) व शुक्रवारी (दि.२७) दोन दिवसात जवळपास ७०० मजुरांनी तक्रारी केल्या आहेत. गोरगरीब बांधकाम मजुरांच्या रकमेवर दरोडा टाकणाèया अधिकारी, कर्मचारी, दलालावर कारवाई होईपर्यंत एकमत पुढाकार घेणार आहे. बांधकाम मजुरांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेऊन कारवाई करण्यासाठी ठिय्या मांडणार आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ३० हजार नोंदणीकृत मजुरांच्या खात्यावर दोन टप्यात (२ हजार व ३ हजार) ५ हजार रुपयांची रक्कम थेट ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. ही रक्कम १५ कोटीच्या घरात आहे. या रकमेतील अर्धी रक्कम बांधकाम मजुरांकडून घेण्यात आली असून दलाल व सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी वाटून घेतल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दैनिक एकमतमध्ये बांधकाम मजुरांच्या रकमेवर कसा डल्ला मारला जात आहे, याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गावोगावचे बांधकाम मजूर आमचीही कशी लूट झाली हे सांगू लागले आहेत.

गुरुवारच्या दि. २६ दैनिक एकमतच्या अंकात ही या अनुषंगाने बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीमध्ये ज्या बांधकाम मजुरांची आर्थिक लूट झाली आहे, त्यांनी एकमत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुरूवारी जवळपास ७०० मजुरांनी दलालाकडून व अधिकाèयांकडून आर्थिक लूट झाल्याचे प्रत्यक्ष सांगण्यात आले आहे. सरकारी कामगार अधिकारी ए. एस. काशीद यांना २०१४ ते आजअखेर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम मजुरांची संख्या, बांधकाम मजुरांना देण्यात आलेल्या लाभाची वर्षनिहाय रक्कम, लॉकडाऊन काळात देण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम आदी माहिती मागितली असता देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बांधकाम मजुरांच्या विविध योजनामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. गावोगावच्या मजुरांनी मिळालेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम दलालांना दिल्याचे सांगितले आहे. गावोगावचे दलाल बिनभोबाटपणे कामगार अधिकाèयांना रक्कम पोहोच करीत असल्याने आजपर्यंत दलालावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांना या योजनांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सवलती देण्यात येतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयाच्या वतीने बोगस बांधकाम मजुरांची नोंदणी करून करोडो रुपयांच्या निधीवर पारदर्शक दरोडा टाकण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजअखेर ६० हजाराच्या जवळपास नोंदणीकृत बांधकाम मजुरांची संख्या आहे. यापैकी गावोगावचे ८० टक्के बांधकाम मजूर बोगस असून ते बांधकाम व्यवसायाशी संबंधित नाहीत. ही बाब एकमतने अनेक गावात केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाली आहे. बोगस लाभार्थीच्या नावावर जमा झालेली अर्धी (५० टक्के) रक्कम दलालामार्फत माघारी घेऊन मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लोकांना कामासाठी घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून नोंदणीकृत मजुरांच्या बँक खात्यावर ऑनलाईन एकदा २ हजार रुपये व परत ३ हजार रुपये अशी एकूण ५ हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात ३० हजार २८३ कामगारांच्या खात्यावर दोन टप्यात ५ हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती सरकारी कामगार कार्यालयातून देण्यात आली. ही रक्कम १५ कोटी १४ लाख १५ हजार रुपये आहे. गावोगावच्या दलालांनी ५ हजारापैकी २ हजार ५०० रुपये बांधकाम मजुराकडून घेऊन दलाल व कामगार अधिका-यांनी लूट केली आहे.

सध्या जिल्ह्यात बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत मजुरांना मोफत सुरक्षा साधनांच्या संचचा (किट) पुरवठा केला जात आहे. गावोगावी याचे वाटप सुरू असून किटसाठी एका मजुराकडून एक हजार ते दिड हजार रुपये घेतले जात आहेत. याचे व्हिडीओ चित्रीकरण एकमतच्या टीमने केले असून अनेक बांधकाम मजुरांनी यामध्ये दलाल व कामगार अधिकारी यांच्यावर आरोप केले आहेत.

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या