23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeउस्मानाबादनियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विसर

नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विसर

एकमत ऑनलाईन

परंडा (प्रशांत मिश्रा) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकड्ढयांना कर्जमाफी देण्यास महात्मा जोतिराव फुले योजना अंमलात आणली व योजनेचा लाभ थकीत शेतक-यांना मिळाला. परंतु नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहिर केले. त्यावेळी शेतक-यांचे समाधान झाले होते.परंतु या घोषणेची अंमलबजावणी होण्यास शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. मात्र सध्या सत्ताधारी व विरोधक या अनुदानाबाबत साधी चर्चाही करताना दिसुन येत नसल्यामुळे नियमीत कर्जफेड करणा-या शेतक-यात शासनाबाबत नाराजी पसरली आहे.

कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभुमीवर या शेतक-यांचे अनुदान रखडले गेले आहे असे उत्तरे शेतकड्ढयांना मिळत आहे. सरकार सत्तेवर येऊन दोन वर्ष लोटले तरी नियमीत कर्ज फेडणा-या शेतक-याना अद्याप प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान मिळाले नाही. ३१ मार्च २०२१ पुर्वी आगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड करा नंतर तुमच्या प्रोत्साहनपर ५० हजार रुपयाची रक्कम लवकरच जमा देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती यामुळे यंदाच्या खरिप हंगामात शेतक-यांना बी बियाणे व रासायनिक खते यासाठी पैशाची चणचण भासत आसल्याने शेतक-यांनी उसनवारीवर पैसे घेऊन खरिपाची पेरणी केली व आता तरी सरकार अनुदान रक्कम देईल आणि आपण लोकांचे ऊसणे घेतलेले पैसे देऊन टाकु अशी आशा शेतक-यांना होती मात्र शासनाकडुन प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे अद्यापही न मिळाल्याने शेतक-यात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

जगाचा पिशिंदा असलेल्या शेतक-यास कोरोना महामारी, आस्मानी सुलतानी, अतिवृष्टी, अवकाळी अशा अनेक संकटाचा सामना करावा लागल्यामुळे शेतक-याना कर्जमाफी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले योजना जाहिर केली. या योजनेचा लाभ बहुतांश थकीत शेतक-यांना मिळाला देखील मात्र कर्जाची नियमित परतफेड करणारे, चालुबाकीदार शेतकरी योजनेच्या लाभा पासुन वर्ष लोटले तरी वंचितच राहीले आहेत. या शेतकरी सभासदाना सरकारने प्रोत्साहनपर ५० हजाराची रक्कम जाहिर केल्याने हे शेतकरी सध्या बँका, विकास सेवा सोसायटीत आमची अनुदानाची रक्कम आली का? अशी विचारणा करीत हेलपाटे मारताना दिसत आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या