21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादद्राक्ष उत्पादक शेतकर्‍याला पावणे चार लाखांना गंडविले

द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याला पावणे चार लाखांना गंडविले

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : एका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याचे ७ लाख २० हजार रूपयांचे द्राक्ष खरेदी करून त्यास केवळ ३ लाख ४५ हजार रूपये दिले. उर्वरित रक्कमेची वारंवार मागणी करूनही शेतकर्‍यास रक्कम दिली नाही. याप्रकरणी संबंधितांविरूद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील समीर सय्यद यांच्या ६ एकर शेतातील १८ मेट्रीक टन द्राक्ष शुभानकर स्वापन प्रधान व लक्ष्मण (दोघे रा. पश्चिम बंगाल) यांना सय्यद यांनी विक्री केले होते. त्याची एकूण किंमत सुमारे ७ लाख २० हजार रूपये होते. उपरोक्त दोघांनी सय्यद यांना त्यांच्या शेतमालापोटी केवळ ३ लाख ४५ हजार रूपये बँक खात्यावर व रोख स्वरूपात दिले.

उर्वरित ३ लाख ७५ हजार रूपये सय्यद यांनी फोनद्वारे सदर दोघांना वारंवार मागणी करूनही त्यांनी ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समीर सय्यद यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून २० जुलै रोजी तक्रार दाखल केली. त्यावरून स्वापन प्रधान व लक्ष्मण या दोघांविरूद्ध २० जुलै रोजी भादंसं कलम ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या