27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeउस्मानाबादतुळजापूर येथे मोबाईल चोरांना अटक

तुळजापूर येथे मोबाईल चोरांना अटक

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तुळजाभवनी मंदिर परिसरात मोबाईलची चोरी करणार्‍या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचे ३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रविवारी दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलुरहट्टी, ता. जि. धावनगेरे (कर्नाटक) येथील तुळजाभवानीचे भक्त कृष्णा नागा नाईक हे २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तुळजापूर येथे दर्शनासाठी आले होते. ते रविवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर परिसरातील मातंगी मंदीराजवळ असताना चार अनोळखी व्यक्तींनी कृष्णा नाईक यांना ठार मारण्याची धमकी देवून त्यांच्या जवळील १५ हजार रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून नेला होता. या प्रकरणी कृष्णा नाईक यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा क्र. ३५४/२०२२ हा नोंदवला होता.

नवरात्र उत्सव निमित्ताने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळजापूर शहरात गस्तीवर होते. यावेळी पथकाने गोपनीय माहितीवरुन तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गांधीनगर, बीड येथील किरण संताराम गुंजाळ, योगेश सर्जेराव गायकवाड, ऋषीकेश बंडू जाधव, विशाल चारु भोसले या चौघांना रविवारी रात्री तुळजापूर येथील कमान वेस परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ चोरीतील विवो मोबाईल फोनसह अन्य चोरीचे दोन मोबाईल फोन आढळले.

पथकाने ते मोबाईल जप्त करुन पुढील कारवाईस्तव चौघांना तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश पवार, पोउपनि संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार हुसेन सय्यद, जावेद काझी, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, शैला टेळे, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या