उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदगाव ता. तुळजापूर येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर १८ जुलै रोजी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ६ जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्या ताब्यातील २ लाख ७८ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंद्याविषयी माहिती काढुन करण्यासाठी दि.१८ जुलै रोजी तुळजापूर उपविभागात गस्तीस गेले होते. दरम्यान, पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील नागनाथ मल्लीनाथ करंडे यांच्या ताब्यातील गाळ्यात तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी नागनाथ करंडे याच्यासह प्रदिप वाघमारे, सुनिल कट्टे, ईरण्णा शिवगुंडे, सुनिल सुरवसे, महेशकुमार चिनगुंडे या ६ जणांना तिरट जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातील जुगार साहित्यासह ४ मोटारसायकल, ४ भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण २ लाख ७८ हजार ४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी जुगार खेळणार्या ६ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- ४,५ अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- अमोल निंबाळकर, जावेद काझी, प्रकाश औताडे, मस्के, पोना- शौकत पठाण, भालचंद्र काकडे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.