23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादतेर येथील जुगार अड्यावर छापा, १५ जणांना अटक

तेर येथील जुगार अड्यावर छापा, १५ जणांना अटक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कळंब येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने तेर येथील २ जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी १५ जणांना जुगार खेळताना पकडून अटक केली. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेर येथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री तेर येथील बसस्थानक ते संत गोरोबा काका मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर परमेश्वर साळुंके व शंकर पवार यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पृथ्वीराज साळुंके, अशोक खांडेकर, सुरज कदम, अमर भोसले, विजय पवार, माजिद बागवान, सुरेश जाधव, राजाभाऊ थोडसरे, प्रभाकर शिंपले, शंकर पवार, लक्षमण राऊत सर्व रा. तेर, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर चामे रा. बुकनवाडी, नानासाहेब पिंपरे रा. रामवाडी, परमेश्वर मारवाडकर रा. मुळेवाडी हे सर्व लोक ऑनलाईन जुगार चालवण्याच्या साहित्यासह आढळले.

पथकाने दोन्ही ठिकाणच्या ऑनलाईन फन टारगेट नावाचा चक्री जुगार चालवण्याच्या साहित्यासह संगणक संच २, भ्रमणध्वनी ८, मोटारसायकल १ व रोख रक्कम असा एकुण १ लाख ५६ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १५ व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४,५ अंतर्गत ढोकी पोलीस ठाण्यात स्वतंत्र २ गुन्हे नोंदवले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन कळंब उपविभागाचे एएसपी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पुजरवाड, पोलीस अंमलदार अंभोरे, खांडेकर, साळुंके यांच्या पथकाने केली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या