26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत साडेआठ लाखांचे जुगार साहित्य जप्त

उस्मानाबादेत साडेआठ लाखांचे जुगार साहित्य जप्त

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यातील बावी शिवारातील उतमी रस्त्यालगत एका पत्राशेडमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये ८ लाख ६२ हजार १०० रूपयांच्या जुगार साहित्यासह १० जणांना पोलिसांनी पकडले.

अपर पोलीस अधिक्षक यांचे चालक सपोनि अमोल पवार, पोलीस नियंत्रण कक्षाचे पोउपनि संदिप ओहोळ यांसह पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यावर गस्तीस होते. दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बावी शिवारातील उतमी रस्त्यालगत वाघमारे यांच्या शेतात एका पत्रा शेडमध्ये काही इसम जुगार खेळत आहेत. यावर पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी राहुल बबनराव भांडवले, शुभम प्रकाश डांगे, जगदिश बबनराव माने, सचिन ज्ञानेश्वर बेंद्रे (सर्व रा. गणेशनगर, उस्मानाबाद), बाळासाहेब हरिश्चंद्र गाडेकर, सोमनाथ आप्पाराव दाने (दोघे रा. सांजा), सचिन हणमंत वाघमारे (रा. समतानगर), सतीश ज्ञानोबा बन (रा. तेर, ता. उस्मानाबाद), सुरज नागनाथ बनसोडे (रा. काटी, ता. तुळजापूर), अमोल फुलचंद मगर (रा. वाघोली, ता. उस्मानाबाद) हे सर्व लोक तिर्रट नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्रा शेडचे मालक वाघमारे हे असून, अमोल फुलचंद मगर हे सदर जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे समजले.

नमूद जुगार अड्ड्यावरून जुगार साहित्यासह १ कार, ३ मोटारसायकल, ९ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ८ लाख ६२ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नमूद व्यक्तींविरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ अंतर्गत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पवार, पोउपनि संदिप ओहोळ, पोलीस अंमलदार माने, भोजगुडे, जमादार यांच्यासह पोलीस मुख्यालयातील येथील जलद प्रतिसाद पथकाचे ८ जवान यांच्या पथकाने केली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या