21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबाद येथे जुगार अड्ड्यावर छापा, २१.८ लाखाचा माल जप्त

उस्मानाबाद येथे जुगार अड्ड्यावर छापा, २१.८ लाखाचा माल जप्त

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद शहरातील एका शेतात असलेल्या पत्रा शेडमध्ये दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये तिर्रट जुगार खेळणा-या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कमेसह २१ लाख ८ हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश पवार यांना दि. ७ ऑगस्ट रोजी गोपनीय खबर मिळाली की, उस्मानाबाद शहरातील सांजा चौक रस्त्याजवळील विद्यामाता इंग्लीश स्कुलच्या पाठीमागे श्रीकांत डोके यांच्या पत्रा शेडमध्ये काही व्यक्ती तिर्रट जुगार खेळत आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद ठिकाणी रात्री ६.३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता तेथे श्रीकांत डोके, नितीन वडवले, रमन जाधव, अझहरोद्दीन शेख, सचिन राऊत, स्वप्नील शिंदे, एजाज शेख, अरविंद गोरे, अहमद शेख, संपत शेरखाने, महादेव वाडकर, गोंिवद चव्हाण, सर्व रा. उस्मानाबाद हे सर्व लोक तिरट नावाचा जुगार खेळत असताना आढळले.

त्यांच्याकडून जुगार साहित्यासह २ चारचाकी वाहने, ६ दुचाकी वाहने, १२ भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण २१ लाख ८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- ४,५ अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि-रामेश्वर खनाळ, सपोनि- शैलेश पवार, पोहेका- विक्रम माने, हुसेन सय्यद, पोना-अमोल चव्हाण, पोकॉ- रविंद्र्र आरसेवाड, योगेश कोळी, साईनाथ आशमोड, सहाने यांच्या पथकाने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या