26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादगावठी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त

गावठी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : अवैधरित्या गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. त्यानंतर दारू बनविण्यासाठीचे रसायन तसेच इतर साहित्य नष्ट केले. तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्याचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात २६ ऑगस्ट रोजी गस्तीस होते. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने बुकनवाडी येथील पारधी पिढी येथे ११.१५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी तेथे बप्पा सुब्राव काळे, शंकर रघु पवार, सुनंदा आबा काळे हे तिघे अवैधरित्या गावठी दारू निर्मिती करताना पथकास आढळून आले.

घटनास्थळी गावठी दारू निर्मितीचे गुळ-पाणी मिश्रणाचा १ हजार २०० लिटर आंबवलेला द्रव पदार्थ लोखंडी- प्लास्टीक अशा ६ पिंपांत भरून ठेवलेला दिसून आला. सदर पदार्थाची ७२ हजार रूपये किंमत होती. सदर द्रव पदार्थ नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट केला. तसेच नमूद व्यक्तींविरूध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम ६५ (फ) अंतर्गत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून ढोकी पोलिस ठाण्याचे सपोनि जगदिश राऊत, पोउपनि बुध्देवार, गाडे, सपोफौ सातपुते, पोहेकॉ भंडारकवठे, पोना क्षिरसागर, गुंड, खोकले, पोकॉ जमादार, शिराळकर, मोरे, स्वामी यांच्या पथकाने केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या