24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeउस्मानाबादमिनी ट्रकमधून १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल लंपास

मिनी ट्रकमधून १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल लंपास

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : चालत्या मिनी ट्रकचे टारपोलीन फाडून अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या हौदातील १ लाख २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना येरमाळा येथील घाटात घडली.

आडूळ (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील मनोज कासलीवाल व त्यांचे सहाय्यक 5 ऑगस्ट रोजी मिनी ट्रक घेऊन (क्र. एमएच २०/ईएल/३३४६) ही सांगली ते औरंगाबाद असा प्रवास करत होते. दरम्यान, सदर मिनी ट्रक कळंब तालुक्यातील येरमाळा येथील घाटातून जात असताना अज्ञात चोरट्यांनी ट्रकचे टारपोलीन फाडून आतील १० किलो ग्रॅम वजनाचे काजूचे ८ डबे व १५ किलो ग्रॅम वजनाचे किसमिसलेची ६ खोकी लंपास केली. सदर मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २७ हजार रूपये आहे.

दरम्यान, मिनी ट्रक येरमाळा येथील चौकात आल्यानंतर त्या दोघांनी ट्रकमधील मालाची पहाणी करण्यास उतरले. त्यावेळी मिनी ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मनोज झुंबरलाल कासलीवाल यांनी येरमाळा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध ६ ऑगस्ट रोजी भादंसं कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या