उस्मानाबाद : टोल नाक्याच्या कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वा लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 18 जुलै रोजी घडली.
केशव हिरासकर यांनी त्यांचा ट्रक (क्र. केए २५/सी/८८०१) हा येडशी उड्डानपुलाजवळील आयआरबी कंपनीच्या कार्यालयाजवळ उभा केला होता. दरम्यान त्या ट्रकच्या हौदावरील टारपोलीन अज्ञात व्यक्तीने फाडून आतील साडी व कपड्यांच्या गठ्ठ्यांसह कुंचल्याचे एक खोके असा एकूण १ लाख २० हजार ८३९ रूपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी केशव हिरासकर यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध २० जुलै रोजी भादंसं कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.