उस्मानाबाद : गेल्या चार दिवासापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व मंत्री, शासकीय यंत्रणा शेतकèयांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करीत आहोत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अंतिम आकडेवारी आल्यानंतर किती नुकसान झाले आहे, हे समजणार आहे. संकाटत सापडलेल्या शेतकèयांना मदत करण्याचा निर्णय झाला असून राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कर्ज काढून शेतकèयांना मदत केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यमंत्री सत्तार हे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी दि. २० उस्मानाबाद जिल्हा दौèयावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीचा अंदाज घेतला. त्यांनी मंगळवारी दिवसभर नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री सत्तार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा नुकसानीचे पंचनामे करत असून येत्या पाच-सहा दिवसात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समजणार आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख ३६ हजार १७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान सोयाबिन पिकांचे एक लाख ५ हजार हेक्टरचे झाले आहे. काही शेतकèयांच्या जमिनी पुरामुळे वाहून गेल्या आहेत. शेतामध्ये सर्वत्र अद्यापही पाणी असून शेतात जाता येत नाही.
नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यापासून व मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना यंत्रणेला दिलेल्या आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी शेतक-यांना कर्ज काढून सरकार मदत करणार आहे. केंद्र सरकारने राजकारण न करता महाराष्ट्राचे हक्काचे पैसे द्यावेत व विशेष पॅकेज देऊन मदत करण्याची गरज आहे. येत्या काळात वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यामध्ये काय होते हे पहावे लागणार आहे.राज्यमंत्री सत्तार यांनी मंगळवारी उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी, वलगुड, झरेगाव, चिलवडी, सुर्डी व बेगडा या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.
सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी