22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादआरक्षणासाठी मराठा समाजाचा भव्य मोर्चा

आरक्षणासाठी मराठा समाजाचा भव्य मोर्चा

एकमत ऑनलाईन

कळंब : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चा साठी एक लाख समाज बांधव उपस्थित होते. कळंब मधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला. मोर्चा चालू असताना पाऊस येत असताना हि मोर्चे करी जागचे हलले नाहीत. मराठा आरक्षण मिळावे या साठी चे निवेदन पाच मुलींनी उप विभागीय अधिकारी यांना दिले.तर मुख्य व्यासपीठावर सात मुलींची भाषने झाली. मोर्चा साठी आलेल्या मराठा बांधव यांच्या साठी केळी, चहा, पाणी , याची जागोजागी सोय करण्यात आलेली होती.

सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा,लाख मराठा अशा घोषणा देत भव्य अशी शिस्तबद्धरित्या समाजातील नागरिक, विद्यार्थी, महिला, लहान मुले यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. आरक्षण आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी कळंब शहर दणाणून गेले होते. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षण नसल्याने मराठा विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे.
शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हालचाली दिसून येत नाही.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. एकच मिशन ओबीसीमधून मराठा आरक्षण ‘ अशा प्रकारच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकरा वाजता निघालेला मोर्चा एक वाजता मोर्चा स्थळ पोचला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या