Tuesday, September 26, 2023

तुळजापूर येथे जनता कर्फ्यूस तिस-या दिवशीही मोठा प्रतिसाद

तुळजापूर : तीर्थ क्षेत्र तुळजापूर शहरात कोरोना रोखण्यासाठी नगर परिषदने पाच दिवस पुकारलेल्या जनता कफ्र्युस तिस-या दिवशीही नागरिकांनी घरातच थांबुन स्वयंस्फुर्तने प्रतिसाद दिला. शहरातील गजबजुन जाणारा मंगळवार पेठ, जुने बसस्थानक चौक येथे शुकशुकाट होता. तसेच बँकांमुळे सर्वाधिक गर्दी होणा-या नळदुर्ग रस्त्यावर बँकांनी जनता कर्फ्यूत सहभाग नोंदवल्याने येथेही शुकशुकाट जाणवत होता.

सकाळी सहा ते नऊ कालावधीत पेपर वितरण करणारे दुध वितरण करणा-या मंडळी व्यतिरिक्त कुणाही रस्त्यावर दिसुन आले नाही. शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे मेडीकल दुकाने वगळता एकही दुकान उघडले नव्हते. त्यामुळे शहरभर सर्वञ शुकशुकाट होता. शासकीय कार्यालय सुरु होती. माञ कामासाठी एकही व्यक्ती न आल्याने कार्यालयातही शुकशुकाट दिसुन आला.

शहरातील पंधरा बँका व भाजीपाला विक्री दुकाने कृषी दुकाने पेट्रोल पंप ही पुर्णपणे बंद होते. बाहेर गावाहुन आलेले रुग्ण व पोलिसांना माञ आज गैरसोयीस सामोरे जावे लागले. जनता कफ्र्यु पाश्र्वभूमीवर सामाजिक कार्यकते आनंद कंदले व आनंद दादा मिञ मंडळाचा वतीने पाच दिवस रुग्णांना दवाखाना ते घर अशी मोफत रिक्षा रुग्ण सेवा सुरु केली होती. त्याचा रुग्णांनी लाभ घेतला.

Read More  सर्व्हेक्षण तपासण्या काटेकारपणे होणे आवश्यक

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या