उस्मानाबाद : तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इतिहास विभागात कार्यरत असलेले डॉ.सतीश कदम यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनी ७३ किलोमिटर सायकलिंग करून हुत्म्यांना अनोखो अभिवादन केले. प्रा.कदम यांनी आजवर देश परदेशात अनेक ऐतिहासिक संशोधने केलेली आहेत. हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि श्री तुळजाभवानी यावर त्यांचा विशेष अभ्यास असून नभोवाणी मंत्रालयाच्या वतीने त्यांनी लिहिलेली हैद्राबाद मुक्तिसंग्रामावर आधारित असे झुंजलो आम्ही नावाची मालिका उस्मानाबाद आकाशवाणीवर खूप गाजलेली आहे.
त्यांच्या लेखनाची शैली म्हणजे ते प्रत्यक्ष संबंधित स्थळांना भेटी देवून लेखन करतात. यादरम्यान त्यांनी स्वातंत््रय सेनांनीच्या कार्याचा जवळून अभ्यास केला, त्यांच्या यातना पाहिल्या. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ३ तास ३६ मिनिटात तब्बल ७३ किलोमीटर सायकqलग करून स्वातंत्र्य वीरांना अभिवादन केले, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या कोरोनामुळे सर्व जग ठप्प झालेले आहे, परंतु यातही संधी शोधून लॉकडाऊन दरम्यान त्यांनी तब्बल २००० किमी सायकलिंग पूर्ण केली आहे. यातून निरोगी आरोग्य आणि इंधन बचतीचा संदेश दिला आहे.
सायकलिंग करत असताना ते वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात, तेथील लोकांना त्या त्या वास्तूचे महत्व पटवून देतात. त्यामुळे गतकालीन घटनांना उजाळा मिळून गावचा इतिहास लोकासमोर यायला मदत होते. हैद्राबाद मुक्ति संग्रामाच्या अभ्यासाकरिता त्यांनी आंध्र, कर्नाटकबरोबरच थेट इंग्लंड आणि अमेरिकेतील निजामाच्या वंशजाशी संपर्क साधलेला आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील ५२ गावे १९५६ पर्यन्त उस्मानाबाद जिल्ह्यात होती. त्यामुळे २२४ वर्ष निजाम राजवटीत राहिलेल्या या लोकांना आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची माहितीच राहिलेली नाही. २०१४ साली प्रा.कदम यांनी माढा तालुक्यातील जामगाव याठिकाणी झेंडा फडकावून सोलापूर जिल्ह्यात प्रथमत:च हैद्राबाद मुक्ति संग्राम साजरा करण्याची परंपरा सुरू केली.
त्यामुळे आज सोलापूर जिल्ह्यातील या ५२ गावात १७ सप्टेंबरला झेंडावंदन होऊ लागले आहे. त्याच्याच एक भाग म्हणून या दिनाचे औचित्य साधून त्यांनी ७३ किलोमीटर सायqलग करून जनजागृती केलेली आहे.
२००० किमी सायकलिंग टप्पा पूर्ण
कोरोनामुळे सर्व जग ठप्प झालेले आहे. असे असताना त्यांनी दोन हजार किलोमिटरचा टप्पा पूर्ण करुन वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी जोपासलेल्या सायकलिंग छंदाचे जिल्हाभरातुन कौतुक होत आहे. नवतरुणांनी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाबरोबर सायकलिंग करावी असे आवाहन डॉ.सतीश कदम यांनी केले आहे.
कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये -सुखबीर सिंग बादल