25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउस्मानाबादकिराणा दुकानाच्या आडून गुटखा, तंबाखू विक्री जोरात

किराणा दुकानाच्या आडून गुटखा, तंबाखू विक्री जोरात

एकमत ऑनलाईन

वाशी : किराणा दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा व तंबाखूची विक्री केली जात आहे. किराणा दुकाने अत्यावश्यक सेवा अंतर्गत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे दुकानदार किराणा दुकानाच्या आडून गुटखा-तंबाखू विक्री करत आहेत. कोरोनाचा विस्फोट झाला असताना शुक्रवारी (दि. १६) वाशी शहरात नागरिकांची रस्त्यावर गर्दी दिसून आली.

राज्यात सर्वत्र लॉकडाउन करण्यात आलेले आहे. कोरोणाची साखळी तुटावी. यासाठी शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाचा वाशी येथील काही टपरीचालक चलता फिरता गुटखा व तंबाखूची विक्री करत आहेत. तसेच किराणा दुकानांमधून गुटखा व तंबाखूची विक्री होत आहे. नागरिकांची किराणा मालाच्या बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने किराणा दुकानदारांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत किराणा दुकाने उघडी ठेवण्यास मुभा दिलेली आहे.

किराणा दुकानदार मात्र या बाबीचा गैरफायदा घेत किराणा दुकानाच्या आडून तंबाखू व गुटखा विकत आहेत. तसेच कोरोना झपाट्याने वाढत असताना वाशी शहरात अनेक नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यामुळे या नागरिकांमध्ये अद्याप गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कोरोणा संसर्गाला आळा कसा बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाशी येथील प्रशासनातील लोकांनी या सर्व बाबीची गांभीर्याने दखल घेऊन गर्दी कमी करणे व किराणा मालाच्या आडून गुटखा- तंबाखू विक्री बंद करण्याची गरज आहे.

पंढरपूरच्या आमदारकीचा उद्या फैसला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या