22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeउस्मानाबादकोंड शिवारात गुटखा तस्करीचा पर्दाफाश

कोंड शिवारात गुटखा तस्करीचा पर्दाफाश

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात गुटखा विक्रीस बंदी असताना कोंड शिवारात लाखो रुपयांचा गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेचा रात्री गस्तीच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि.22) मध्यरात्री पर्दाफाश केला आहे. गुटख्यासह टेम्पो व पिकअप या दोन वाहनांसह 70 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करर्णा­यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी बुधवारी (दि.22) रात्री गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावात गेले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कोंड येथील महांिलग नागु कोरे हे कोंड शिवारातील आपल्या शेतातील गुदामात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा बाळगलेले आहेत.

यावर पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी महांिलग कोरे हे गुदामात व त्यासमोर उभ्या असलेल्या आयशर टॅम्पो क्र. (एम.एच. 24 जे 7523) व पिकअप क्र. (एम.एच. 24 एपू 3889) मध्ये 49 पिशव्या गुटखा गोल्डकिंमत 52 लाख 92 हजार बाळगलेले आढळले. यावर पथकाने गुटखा व दोन्ही वाहने असा एकुण 69 लाख 92 हजार रुपयेकिंमतीचा मुद्देमाल जप्त करुन महांिलग नागु कोरे यांच्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 328, 272, 272, 188 अंतर्गत ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सदरची कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, पोहकॉ. अमोल ंिनबाळकर, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, धनंजय कवडे, महेबुब अरब, सुभाष चौरे, पोना- शौकत पठाण, अजित कवडे, भालचंद्र काकडे, नितीन जाधवर, शैला टेळे यांच्या पथकाने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या