27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउस्मानाबादशिराढोण येथे सव्वा पाच लाखांचा गुटखा पकडला

शिराढोण येथे सव्वा पाच लाखांचा गुटखा पकडला

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील शिराढोण येथे छापा टाकून सव्वापाच लाखाचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.२६ मे ) सायंकाळी करण्यात आली.

पोलीसांनी सांगितले की, कळंब तालुक्यातील शिराढोण येथे मानवी आरोग्यास घातक असलेला व महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधीत केलेला गुटखा याचा साठा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने शिराढोण येथे गुरुवारी (दि.२६) सायंकाळी छापा टाकला. शिराढोण येथील जमीर जिलाणी तांबोळी, (वय ३२) हे राहत्या घरासमोर अ‍ॅपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. २५ एजे ३१२५ मध्ये गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण ५ लाख २६ हजार ८७० रुपयांचा माल बाळगलेले आढळले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्क पोलिस निरिक्षक निलंगेकर, पोहेकॉ जानराव, काझी, निंबाळकर, काझी, चौरे, पोना- पठाण, काकडे, कवडे, जाधवर, टेळे, सोनवणे, पोकॉ- पठाण यांच्या पथकाने केली. यावेळी पथकाने तांबोळी यांना वाहन व त्यातील अन्न पदार्थासह ताब्यात घेउन पोहेकॉ- विनोद जानराव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पोलिस ठाणे येथे गुन्हा क्र. ११९/२०२२ हा भा.दं.सं. कलम- ३२८,१८८,२७२,२७३ अंतर्गत नोंदवला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या