32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeउस्मानाबादचेकपोस्टवरील पोलीस कर्मचा-यांचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सत्कार

चेकपोस्टवरील पोलीस कर्मचा-यांचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सत्कार

एकमत ऑनलाईन

काटी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील चेकपोस्ट वरील पोलीस कर्मचा-यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सत्कार केला.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापुर उस्मानाबाद जिल्हा सिमेवर कोविड १९ संदर्भात उभारलेल्या आलेल्या पोलीस तपासणी चेकपोस्टला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खा. ओमराजे निंबाळकर यांनी भेट देवून ड्युटीवर असणा-या पोलीस कर्मचाèयांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापुर दौरा आटोपुन उस्मानाबादकडे जात असताना रविवारी पाच वाजता त्यांनी तामलवाडी गावानजिक असणा-या पोलीस तपासणी चेकपोस्टला भेट दिली. यावेळी पोलीस कर्मचारी पाच महीन्यापासुन कोरोना लॉकडाऊन काळात कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलिसांचा उत्कृष्ठ कामगीरीबद्दल पुष्पगुच्छ देवुन कर्तव्यावर असणाèया पोलीसांचा सत्कार केला.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आदीत्य गोरे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे पोकॉ. आकाश सुरनुर, अभिजीत चुंगे आदीजण उपस्थित होते.

Read More  गेवराईत तिघांचा मृत्यू; शहरात भितीचे वातावरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या