22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादसलगरा परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

सलगरा परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

एकमत ऑनलाईन

सलगरा : तुळजापूर तालुक्यातील सलगरा दि व परिसरातील अनेक गावांत बुधवारी व गुरूवारी दि. ८ सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. शेतातील उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

सलगरा व परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजता अतिमुसळधार पाऊस पडला. काल बुधवारीही सकाळी मुसळधार पाऊस पडला होता. सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. प्रचंड पडलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. शेतातील उभ्या पिकांची नासाडी झाली असून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या