22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी दिवसभरात परतीच्या पावसाने सर्वदूर धुमाकूळ घातला. दमदार झालेल्या पावसामुळे नदी, नाले भरुन वाहत होते. या पावसामुळे खरिप हंगामातील सोयाबीन पिकात पाणी साचले. तसेच काढून ठेवलेले सोयाबीनचे काड भिजून शेतकèयांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा ऊसाचा सफाया झाला आहे. तर वीज पडून अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहे. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. उस्मानाबाद तालुक्यात शहरासह परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाले, ओढे यांना पाणी आले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन काढणीची कामे सुरु असून अनेकांचे सोयाबीन काड भिजून नुकसान झाले आहे. भूम तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या व काढून ठेवलेल्या सोयाबीनसह खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले. भूमपासून दोन किलोमीटरपर्यंत असलेल्या साबळेवाडी शिवारात इलाही पटेल (रा. भूम) हे जनावरे चारत असताना वीज पडून गाय दगावली. यात त्यांचे ४५ हजाराचे नुकसान झाले. भूम ते सरमकुंडी रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबवली होती. वाशी तालुक्यातील पारा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे गावच्या शिवारात असलेले दोन्ही साठवण तलाव तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. सलग दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

परंडा तालुक्यातील जेकटेवाडी परिसरात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खंडेश्वर प्रकल्पाला भेग पडल्याने व तलावाच्या परिसरात मोठा पाऊस झाल्याने उंडेगाव, qचचपूर (खु.), वाटेफळ व नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दवंडी देवून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग व परीसरात रविवार दुपारी दोन ते तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे बोरी धरणाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी सांडव्याद्वारे जोराने वाहत आहे. त्यामुळे अनेकांनी मासेमारी चालू केली आहे. बोरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. किल्ल्यातील नर-मादी धबधबा पाहण्यासाठी सोलापूर येथील काही पर्यटक मैलारपूर या मार्गे किल्ल्यात जाताना दिसून आले. पावसामुळे शेतक-यांनी काढून ठेवलेले सोयाबीनचे पिक भिजल्याने सोयाबीन काळे पडून नुकसान झाले.

कळंब येथे व परिसरात दिवसभर मुसळधार पाऊस चालू होता.तालुक्यातील लहान, मोठे नद्या, नाले पाण्याने पुर्ण भरून वाहू लागल्याने व हे पाणी रस्त्यावर आल्याने वाहुतुकीला अडथळा आला. मुसळधार पाऊस पडल्याने धनेगाव धरण ७० टक्के भरले आहे. मांजरा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. उमरगा तालुक्यातील जोरदार पाऊस झाला. दाळींब परिसरात वादळी वा-यामुळे ऊस पिकाचे आडवे पडून मोठे नुकसान झाले आहे. वीज पडून दोन गायी व एक म्हैस दगावली. काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले.

शहरातील ६२३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या