30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध केला. उस्मानाबाद शहरातील महाराष्ट्र विद्युत वितरणाच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.सदस्य सुधीर पाटील, अ‍ॅड. खंडेराव चौरे, अ‍ॅड नितीन भोसले, इंद्रजित देवकते, युचा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक बालाजी कोरे, योगेश जाधव, दाजीआप्पा पवार, विनायक कुलकर्णी, गिरीश पानसरे, विनोद निंबाळकर, प्रवीण पाठक, सुनील पंगुडवाले, रमन जाधव, अमोल राजेनिंबाळकर, विनायक कुलकर्णी, संदीप इंगळे, सूरज शेरकर, बंटी मुंडे, ओम नाईकवाडी, अशोक पेठे, स्वप्नील नाईकवाडी, गणेश इंगळगी, राज निकम, हिम्मत भोसले, गणेश मोरे, विशाल पाटील, अतिक शेख, शरीफ शेख, श्रीराम मुंबरे, प्रवीण सिरसट, अक्षय भालेराव, सुशांत लोकरे, आबा देशमुख, आतिक पटेल, नरेन वाघमारे, मेसा जानराव, तसेच शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तर भूम येथे भाजपाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी लाईट बिलाची होळी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस आदम शेख, शहराध्यक्ष संतोष सुपेकर, आरपीआयचे भागवत शिंदे, शंकर खामकर, बालाजी बांगर, सुजित वेदपाठक, सचिन बारगजे, मेहबूब शेख, जयसिंग पवार, गवळी आदींची उपस्थिती होती.

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या