27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeउस्मानाबादतुळजाभवानी मंदिरात होम व हवनाची जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते विधीवत पुजा

तुळजाभवानी मंदिरात होम व हवनाची जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते विधीवत पुजा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते सोमवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली.

यामध्ये सकाळी ११.३० वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह, याचे हवन करण्यात आले. दुपारी ४.४५ वाजता पूर्णाहुती करण्यात आली. नंतर परंपरेनुसार कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थान येथे पूर्णाहुती करण्यात आली. श्री गणेश विहारमध्ये हैद्राबाद संस्थान तर्फे विशाल कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते.

कोल्हापूर संस्थानच्या वतीने उपाध्ये प्रतीक प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. नंतर श्री तुळजाभवानी देवीची पाद्य पूजा, आरती, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंद यांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले. हा धार्मिक विधी आनंदाने पार पडला.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, विश्वास कदम सहायक व्यवस्थापक (धार्मिक), सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, यांच्यासह नागेशशास्त्री नंदीबुवा, राजाराम अंबुलगे, सुनित पाठक, राजन पाठक, राजू प्रयाग, शैलेश पाठक, प्रल्हाद पैठणकर, अनंत कांबळे, मयुर कमठाणकर उपस्थित होते. मंगळवारी दि. ४ ऑक्टोबर रोजी महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी १२ वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या