30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर

उस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव प्रचंड वाढला आहे. त्यात उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील प्रचंड वेगाने संसर्गाचा फैलाव सुरु आहे. जिल्ह्यात वाढता आलेख कायम आहे. सोमवारी (दि.१२) आलेल्या अहवालात तब्बल ६८० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा आकडा थांबता थांबेना झाला असून हजाराच्या आसपास आकडा गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. असे असताना प्रत्येक रुग्णालयात अ‍ॅन्टीजन, आरटीपीसीआर तपासणीसाठी गर्दी कायम आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत आनखी आनखी वाढ होणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी झपाट्याने पसरत आहे. विशेष म्हणजे आज एकही गाव रुग्ण नसल्यापासून वंचित राहिलेले नाही. गावोगाव हा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तपासणीच्या सुविधा नसल्यामुळे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीसाठी प्रचंड रांगाच रांगा लागत आहेत. ही तोबा गर्दी पाहून आनखी रुग्ण संख्या वाढणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे कोरोनाची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

सोमवारी (दि.१२) कोरोना ६८० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत २५ हजार ८७७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २० हजार ६६० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ५ हजार २१७ रुग्णांवर उपचार सध्या सुरु आहेत. सोमवारी २८२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. उस्मानाबाद शहरासह तालुक्यात सर्वाधिक ३८२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर ७१, उमरगा ५१, लोहारा २७, कळंब ७६, वाशी २५, भूम १८ व परंडा तालुक्यात ३० रुग्ण सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात अशीच संख्या वाढत राहिली तर आरोग्य यंत्रणेवर तान निर्माण होणार आहे. तसेच रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळी काळजी घेण्याची गरज आहे.

मुरूम पालिकेवर टाळ मृदंगाच्या गजरात निषेध मोर्चा; दारु बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या