नळदुर्ग (सचिन गायकवाड) : नळदुर्गच्या इतिहासातील ५३ वर्षानंतरचा सर्वात मोठा महापूर दि.१३ रोजी रात्र भर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मैलारपूर येथील जुने खंडोबा मंदिर तसेच नविन खंडोबा मंदिराला पुराच्या पाण्याने घातला वेढा १९६७ तसेच १९९७ नंतरचा सर्वांत मोठा महापूर बोरी धरणांच्या साडव्यातुन येणाऱ्या पुरामुळे नर मादी धबधब्याच्या वरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे
नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचा अख्खा उसाचा फड गेला वाहून शेतातील काढलेले सोयाबीन च्या बनीम चेंडू सारख्या पुरात वाहून गेले आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या पाईप लाईन मोठमोठी झाडे सोयाबीनच्या गंजी पाण्यात वाहून गेल्यामुळे नळदुर्ग व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नळदुर्ग येथील खंडोबा मंदिर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत सोयाबीन गेले पुरात वाहून बोरी धरणाच्या सांडव्यातून येणारे पाणी नदीपात्राच्या बाहेरून तब्बल अर्धा किलो मीटर पर्यंत पुराचे पाणीच पाणी
परतीच्या पावसाचे जोरदार धुमशान चिकुद्रा, किलज,सलगरा ( दि. ) ,होर्टी आदी गावचा संपर्क तुटला मोबाईल फोन नेटवर्क, विज , वाहतुक विस्कळीत चिकुद्रा गावचा तिन्ही बाजूंनी जोडणार्या रस्त्याच्या पुलावरून तिनं ते चार फुट पाणी चिकुद्रा व किलज दरम्यान जोडणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून सात फूट पाणी वाहत आहे. बोरी धरणाच्या सांडव्यातून वाहत येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला गंधोरा सलगरा किलज भोईटे वस्ती होर्टी तसेच चिकुंद्रा येथून साठवण तलावाच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे बोरी धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी जास्त वेगाने वाहत आहे तर मैलारपूर येथे असलेल्या पुलावरून जवळपास दहा ते बारा फूट उंचीवरून पाणी वाहत आहे त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मैलारपूर येथील पुलावरून वाहत असलेले पाणी पाण्यासाठी नळदुर्ग येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती