24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादपत्नीच्या अनैतिक संबधातून पतीची आत्महत्या

पत्नीच्या अनैतिक संबधातून पतीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नौकरीस असलेल्या महिलेचे ढोकी येथीलच एकाशी अनैतिक संबंध होते. या पत्नीच्या संबंधास वैतागून मुळ कोंड येथील रहिवाशी असलेल्या त्या महिलेच्या पतीने कोंड शिवारातील स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवार, दि. ५ जून रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकरावर मयताच्या भावाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिल्या माहितीनुसार, ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोंड येथील स्वाती सतीश तिवारी ही परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिला पती सतीश कवरसिंग तिवारी याच्यापासून एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. सतीश व स्वाती ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्वार्टर्समध्ये राहत होते. तीन वर्षापासून सतीश व स्वाती यांच्यात चारित्र्याच्या संशयावरुन वाद होता. ३१ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सतीश घरी गेला असता त्याला एका खोलीत ढोकी येथील विवेक देशमुख व स्वाती हे एकत्र रुममध्ये संशयास्पद अवस्थेत दिसले. सतीशने याबाबत जाब विचारल्यावर स्वाती व विवेक या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. सतीशने याबाबत ढोकी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

यानंतर सतीश पत्नीचे वागणे आवडत नसल्याने तिला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ती त्याचे ऐकत नव्हती. यामुळे सतीश वैतागला होता. अखेर त्रास अस झाल्याने त्याने रविवार दि. ५ मे रोजी कोंड शिवारात शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद सतीशचा भाऊ उमेश कवरसिंग तिवारी यांनी ढोकी पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून स्वाती व विवेक देशमुख या दोघांवर भादंवि कलम ३0६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ढोकीचे सहायक पोलिस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बुधेवार करीत आहेत.

घटनेची माहिती गावात पसरल्यावर सतीश तिवारीचे नातेवाईक, गावकरी घटनास्थळी पोहोचले. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे वातावरण तापले होते. अखेर ढोकी पोलिसांनी स्वाती तिवारी व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल करून स्वातीला ताब्यात घेतले. यानंतर तणाव निवळला. घटनास्थळी ढोकीचे पोलिस उपनिरीक्षक गाडे, क्षीरसागर, गुंजकर, नांदे, गोडगे आदी कर्मचा-यांनी भेट दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या