कळंब : तालुक्यातील शिराढोण येथील काजल मारुती माने (वय-१९) वर्षीय महिलेचा तिच्या पतीने गळयावर ईळी, कोयता तसेच विटांनी वार करुन निघृण हत्या केल्याची घटना गुरुवार (ता.२१) दुपारी २ वाजाता घडली. घटनेची माहिती शिराढोण पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व सदरील महिलेचा पती कृष्णा जाधव यास ताब्यात घेवून तपासकाम सुरु केले.
शिराढोण येथील काजल माने हिचा विवाह एक वर्षापुर्वी मांजरगाव ता.जि.जालना येथील कृष्णा जाधव यांच्या सोबत झाला होता. एक महिन्या पुर्वी काजल हि आपल्या माहेरी म्हणजेच शिराढोण येथे आली होती. ता.२० रोजी तिचा पती कृष्णा जाधव हा तिला घेवून जाण्यासाठी आला होता. मयत मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार तिचा पती तिला आल्यापासून किराणा, गॅस तसेच रोख पैशाची मागणी करत होता व आईची आर्थिक परीस्थती नसल्याने हि मागणी पुर्ण होवू शकत नसल्यानेच तिच्या पतीने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगीतले.याप्रकरणी शिराढोन पोलिसात रात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.