23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeउस्मानाबाद29 लाख 34 हजारांंचा अवैध गुटखा जप्त

29 लाख 34 हजारांंचा अवैध गुटखा जप्त

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या विक्री करणार्‍यांवर छापे टाकले. यामध्ये पोलिसांनी 5 ठिकाणी छापे टाकले असता तब्बल 29 लाख 34 हजार 645 रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये 8 जणांवर कारवाई करून 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांची महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करणार्‍या इसमांची माहिती काढून कारवाई करणे कामी 9 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करणार्‍या इसमांची खात्रीशिर बातमी मिळ्याल्याने सहाय्यक पोलीस अधिक्षक एम. रमेश उपविभाग कळंब यांना सदरची माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि जी. पी. पुजरवाड व पोलीस पथकासह उस्मानाबाद शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. अमृतनगर येथील दिलदार अब्ररार पठाण (वय 38, रा. अमृतनगर उस्मानाबाद) याचे पठाण किराणा स्टोअर्स येथे छापा मारला असता प्रतिबंधित असलेला गुटखा साठवण व विक्री करीत असताना मिळून आला. त्याच्याकडून एकूण 95 हजार 467 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

उस्मानाबाद शहारातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेट्रोल पंपाचे रोडलगत असलेल्या रोडलगत रोनक ट्रेडर्सच्या पत्रा शेडमध्ये छापा मारला असता सदर इसमाचे ताब्यातून 52 हजार 482 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारत विद्यालय रोडवरील कचरा डेपो रोडलगत असलेल्या पत्राचे शेडमध्ये सर्फराज जिलानी सय्यद (वय 33, रा. ख्वॉजा नगर गल्ली नं 6), मालक नामे रिजवान मौला शेख (रा. राजा की बुडीतालीम गल्ली) याच्या ताब्यातून तब्बल 2 लाख 49 हजार 120 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. इंदिरानगर येथे जे. के. पान मटेरियल नावाचे दुकानामध्ये अविनाश बाबासाहेब विधाते (वय 31, रा. तुळजापूर नाका गावसुद रोड उस्मानाबाद), मालक नामे जाकेर बाबुलाल तांबोळी (रा. आगड गल्ली उस्मानाबाद) यांच्या ताब्यातून तब्बल 10 लाख 21 हजार 285 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.

उस्मानाबाद शहरात धाराशिव कमानी जवळ पत्रा शेडमध्ये महेबुब उर्फ बबलू फकीर शेख (वय 40, रा. उस्मानाबाद) याच्या ताब्यातून 97 हजार 939 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 5 ठिकाणी गुटका साठवून विक्री करणार्‍यावर छाप्यात गुटका, चारचाकी वाहन, मोबाईलसह एकूण 29 लाख 34 हजार 645 रूपयांचा मुद्देमाल व एकूण 8 इसमावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे 4 गुन्हे व आनंदनगर पोलीस ठाण्यात 1 एकूण असे 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या