27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeउस्मानाबादबेकायदेशिररित्या वाहन चालकांची लुट; गुन्हा दाखल

बेकायदेशिररित्या वाहन चालकांची लुट; गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : शहरात वाहनतळ लिलाव प्रक्रियेमध्ये नमूद केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग करून वाहन चालकांची लुट केली. या प्रकरणी एकाविरूद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर येथील सिताराम विलास छत्रे याने शहरात वाहनतळ लिलाव प्रक्रियेमधील करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केला. तसेच १ फेब्रुवारी २०१५ ते ३१ जानेवारी २०१८ या कालावधीत तुळजापूर शहरात प्रवेश करणार्‍या वाहन धारकांकडून बेकायदेशिररित्या शहर प्रवेशाच्या नावाखाली शहरातील सर्व ठिकाणी वाहन चालकांची अडवणूक करण्यास सुरूवात केली. तसेच संबंधित वाहन चालकांकडून या कालावधीत तब्बल १ कोटी रूपये वसूल करून अपहार करून वाहन चालक व नगर परिषदेची फसवणूक केली.

या प्रकरणी उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे चालू असलेल्या चौकशीत सदर बाब निदर्शनास आली. याप्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेशित केल्यावरून तुळजापूर नगर परिषदेचे मिळकत व्यवस्थापक शिवरत्न आतकरे यांनी ९ सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून सिताराम विलास छत्रे याच्या विरूद्ध भादंसं कलम ४२०, ४०६, ४६८, ४६५, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या