29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeउस्मानाबादवाळलेल्या तणसावर कृष्ण पांचाळ यांनी आकारली शिवरायांची प्रतिमा

वाळलेल्या तणसावर कृष्ण पांचाळ यांनी आकारली शिवरायांची प्रतिमा

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे) : चित्रकलेचं कोणतेही शास्त्रोक्त धडे गिरवले नसताना तालुक्यातील शिराढोण येथील कृष्णा पांचाळ कलाकारांने गव्हाच्या काढनीनंतर शेतात उभ्या असलेल्या वाळलेल्या तणसाला आकार देत तब्बल एक एकर क्षेत्रावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली आहे.श्रीमंतयोगी युवा मंचने शिवजयंतीच्या निमित्ताने राबवलेल्या उपक्रमात पांचाळ यांनी ‘ग्रास व क्रॉप’ या नव्या पेटींग प्रकाराचा समन्वय साधत ही विक्रमी कलाकृती वास्तवात आणली आहे.

छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रीमंतयोगी युवा मंचने आयोजीत केलेल्या उपक्रमात शिराढोन येथील कृष्णा पांचाळ तरूणानेही विक्रमी कलाकृती साकारली आहे. श्रीमंतयोगी युवा मंचच्या कुलदीप पाटील, महेश माकोडे, ऋषीकेश कासार, दत्ता माकोडे, अविनाश माकोडे, अजय म्हेत्रे , समाधान माकोडे , सुजीत सुरवसे आंदीनी छत्रपती शिवराय यांची भव्य प्रतिमा साकारत शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केला होता. ही कल्पना सवंगडी असलेल्या कृष्णा वसंत पांचाळ यांनी वास्तवात आणण्यास सुरूवात केली. यानुसार सलग चार दिवस मेहनत करत कृष्णा यांनी लातूर रोडवरील एका शेतात तब्बल ४० हजार स्वेअर फूट आकाराच्या शेतात काढलेल्या गव्हाच्या शेतात छत्रपती शिवराय यांची प्रतिमा साकारली आहे.

कृष्णा यांनी निवडलेल्या जमिनीवरील गव्हाची नुकतीच काढणी झाली होती. याठिकाणी कापणीनंतर शेतात गव्हाचे खुरटे काड उभे होते. साधारणतः एक एकर आकाराच्या या पिकात ३१० बाय १०५ फुट आकारात महाराजांच्या प्रतिमेची ग्राफिक्सनुसार आखणी केली. यानंतर डिझेल स्टोच्या झळांचा वापर करत गव्हाचे तणस जाळण्यात आले. आकारास आवश्यक तेवढा भाग जाळायचा अन् उर्वरीत भाग लागलीच पाणी टाकत विझवायचा अशी कसरतीची चार दिवस कृती करत कृष्णा पांचाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची विक्रमी प्रतिमा साकार केली आहे.

कृष्णा पांचाळ यांनी ना चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं आहे ना एखादा ‘आर्ट’ डिप्लोमा, अंगी काय ती फक्त चित्रकलेची आवड. या वेडातूनच त्याची कला बहरत गेली.यातून प्रोफेशनल कलरींग व पेटींगची कामे करत राहिला. यात मग अधूनमधून आपल्या कल्पकतेने विविध प्रकाराच्या चित्रकृती,चित्रप्रकार साकारण्याचा त्याचा छंद आहे. शिराढोन येथे गव्हाच्या काढनीनंतर वावरात उभ्या असलेल्या वाळलेल्या तणसाला आकार देत छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेत.

१५-२० दिवसांत आणखी उद्रेक !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या