27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeउस्मानाबादपीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाची तात्काळ बदली करा

पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाची तात्काळ बदली करा

एकमत ऑनलाईन

लोहारा : महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्याकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत होत असलेली टाळाटाळ व अपमानास्पद वागणूक याबाबत या बँक शाखा व्यवस्थापकाची तात्काळ बदली करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दि. २५ वार शुक्रवार रोजी लोहारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

लहुजी शक्ती सेना लोहारा तालुक्याच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शासनाने वारंवार बँकेला शेतकऱ्यांची हेळसांड करू नका, अशा सूचना देऊन देखील लोहारा शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्याकडून शाखा व्यवस्थापक शैलेश हवा हे शेतकऱ्यांची पिळवणूक करत उद्धट वर्तन करीत आहेत. शिवाय पिक कर्ज मागणीच्या प्रस्तावाची विचारणा करण्यासाठी गेले असता त्या शेतकऱ्यांना तुम्हाला कर्ज मिळत नाही. तुम्हाला कुठे जायचे आहे तिथे जावा, असे उद्धट वागणूक देऊन अपमानास्पद बोलून शेतकऱ्यांना काही बोलू नका, तुम्हाला कर्ज मिळत नाही असे उद्धटपणे वर्तन करत आहेत.

याला शेतकरी ज्ञानेश्वर जनार्दन रसाळ साक्ष आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच गेल्या अनेक महिन्यापासून प्रस्ताव केलेले शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर झाले की नाही या मागणीसाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. या बँकेमध्ये होत असलेली दलालांची हुजूरीगिरी तात्काळ बंद करण्यात यावी.

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज देण्यात यावे व बँक शाखा व्यवस्थापक यांची तत्काळ बदली करण्यात यावी. अन्यथा लहुजी शक्ती सेना लोहारा तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा पुढील होणार्या सर्व घटनेस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल अशा आशयाचे निवेदन लोहारा तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर लहुजी शक्ती सेना लोहारा तालुका अध्यक्ष दीपक भाऊ रोडगे,युवा तालुकाध्यक्ष विकी मोरे, नितीन रोडगे, बालाजी कसबे, आकाश चिमुकले, नंदकुमार वाळके, महेश गोरे, तुकाराम पाटील, संपत देवकर सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चिकन-मटण का खातेस? असे विचारले म्हणून रागाच्या भरात डोक्यावर फोडली बिअरची बाटली

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या