36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत कोरोणा रोखण्यासाठी गणपतीसाठी विसर्जन रथ

उस्मानाबादेत कोरोणा रोखण्यासाठी गणपतीसाठी विसर्जन रथ

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उस्मानाबाद नगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील लहान-मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी शहरात विसर्जन रथ फिरविण्यात येणार आहे. त्यासाठी गणेश भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी केले आहे. त्यासाठी गेल्या कांही वर्षांपासून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी श्री गणेशाचे विसर्जन न करणा-या गणेश मंडळांना नाट्यगृहात गणपती ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी माहिती देताना नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच कोरोना रोखण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन टाळण्यासाठी नगरपालिकेच्या नाट्यगृहात त्या जतन करण्यात येणार आहेत. तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लहान गणेशमूर्ती थेट प्रत्येकाच्या घरासमोरच विसर्जित करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

यासाठी चार टँकर प्रत्येक घरासमोर नेऊन बाप्पांच्या विसर्जनाची संधी प्रत्येक भक्तांना घरबसल्या देण्यात येणार आहे. जलप्रदुषण तसेच याच्या प्रभावाने मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर होणारा वाईट परिणाम टाळण्यासाठी पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेल्या गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित करणे टाळणे सध्या आवश्यक बनले आहे. प्लास्टर ऑफ परिसची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते, हे सिद्ध झाले आहे. यावर्षीही नगरपालिकेच्या वतीने गणेशमंडळांना मूर्ती पालिकेत जतन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील सर्वच गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती जतन करण्यासाठी नगरपालिकेने यावर्षीही व्यवस्था केली आहे. नाट्यगृहाच्या खालच्या तळमजल्यावर व्यवस्थितपणे मूर्ती ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. मूर्तीवर धुळ किंवा पाणी पडल्यानंतर खराब होऊ नये म्हणून आवरण तयार करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे वेगळे नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षित अंतराचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून थेट भक्तांना त्यांच्या घरासमोरच मूर्ती विसर्जनासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासाठी पाण्याचे टँकर असलेली चार वाहने प्रत्येक गल्लीत नेण्यात येणार आहेत. आपल्या गल्लीत वाहन आल्यानंतर थेट टँकरच्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करण्यात येणार आहे. यामुळे विसर्जन विहिरीवर गर्दी होणार नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे पालिकेच्या वतीने यावर्षी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तसेच कोरोनाला हद्दापार करण्यासाठी गणेश भक्तांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

कोरोनाचा कहर ; ३0१ पॉझिटीव्ह

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या