31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादकळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक निवडीचा घोळ

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक निवडीचा घोळ

एकमत ऑनलाईन

कळंब : पाच वर्षांचा कालावधी संपणाऱ्या कळंब तालुक्याल ५९ ग्रामपंचायतमध्ये प्रशासक निवडीचा घोळ मिटेना गेला आहे. १२ व १३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील १९ ग्रामपंचायत च्या मुदती संपल्या आहेत.तरीही प्रशासक निवडीच्या आदेशावर सक्षम अधिकाऱ्याच्या सह्या झाल्या नसल्याने निवडीबाबत सस्पेन्स वाढला आहे.मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतची धुरा प्रशासकाच्या हाती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.यामुळे राजकीय घोडेबाजाराला चाप बसणार आहे.

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतमधील सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात विध्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपणार आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्यास्थितीत ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार नसल्याने सरकारमार्फत प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता.प्रशासकांची निवड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निवड करून तसा आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कळविणे अनिवार्य आहे.तालुक्यातील १९ ग्रामपंचायतच्या सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ १२ व १३ सप्टेंबर रोजी संपुष्टात आला आहे.तरीही प्रशासकाच्या निवड न झाल्याने सस्पेन्स वाढला असून मुदत संपूनही निवडी का झाल्या नाहीत असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मुदत संपलेल्या व संपणाऱ्या ग्रामपंचायती
अडसुळवाडी,देवधानोरा,रायगव्हान,वडगाव (शी),वानेवाडी यांची १२ सप्टेंबर रोजी मुदत संपली तर १३ सप्टेंबर रोजी बोरगाव (खुर्द),बारमाचिवाडी,बोरवंटी,चोराखळी,सातेफळ, सात्रा, ढोराळा, इटकुर,रांजनी,शिगोली, ताडगाव,वाकडी( ई),वाकडी (केज),उमरा/परतापूर या ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत.१४ रोजी तीन ,१६ रोजी ११,१७ रोजी एक,१८ रोजी दोन,२० रोजी ८,२१,२२,२३ रोजी प्रत्येकी एक,२४ रोजी दोन,२६ रोजी दोन,२७,२८ रोजी प्रत्येकी एक,२२ व २४ डिसेंबर रोजी प्रत्येकी एक आशा ५९ ग्रामपंचायतीच्या मुदती संपणार आहेत.

प्रशासकाच्या निवडीची यादी पाठवली
याबाबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी ए जी नवाले यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी प्रशासकाच्या निवडीच्या याद्या पंचायत विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत.असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचे तेरा बळी , 601 नवं बाधीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या