34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home उस्मानाबाद आकडेवाले जोमात, मिटरवाले कोमात

आकडेवाले जोमात, मिटरवाले कोमात

एकमत ऑनलाईन

नळदुर्ग (प्रतिनिधी) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहर तथा परिसरातील  ग्रामीण भागात अद्यापही आकडे  टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

वीज चोरीमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे.नियमित वीज बिल भरूनही अनेकांना वीज पुरवठा अखंडित होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आकडे टाकून वीज घेत असल्याने याच वर्षी गेल्या मे महिन्यात अतिरिक्त भारामुळे नळदुर्ग येथील रोहित्र जळाले परिणामी वीज वितरण कंपनीचे तब्बल साठ लाखांचे नुकसान झाले होते.

ग्रामीण भागात सातत्याने वीज चोरीमुळे अपघात होण्याची भीती असते. यामुळे गावातील ईतर रोहित्र जळण्याची शक्यता असल्याने याकडे  लक्ष देण्याची गरज आहे.महावितरण्याच्या वरिष्ठांनी लक्ष  देऊन वीजचोरी थांबवावी व वीज चोरी करणाऱ्या आशा या बहाद्दरावर  कडक कारवाई करण्यात यावी असा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या